वाहन निर्मिती क्षेत्रासाठी कठीण काळ; कंपन्यांमध्ये नाराजी
पायाभूत श्रेत्रांसाठी उपकर एक ते चार टक्क्य़ांनी वाढविल्याने साध्या तसेच दहा लाखांवरील कारच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे. यामुळे आधीच मंदीच्या झळा सोसणाऱ्या कार उत्पादक कंपन्यांमध्ये खळबळ माजली आहे.
राजधानी दिल्लीमध्ये पर्यावरणाच्या विषयावरून डिझेलच्या १५००सीसीच्या आतील कारवर २.५ टक्के सेस वाढविण्यात आला आहे. तर त्यावरील कारवर चार टक्के उपकर लावण्यात आला आहे. तसेच पेट्रोल, सीएनजी, एलपीजी कारवरही एक टक्का उपकर वाढविण्यात आला आहे. ही करवाढ १२००सीसी च्या आतील वाहनांवर करण्यात आली आहे. या करवाढीच्या पाश्र्वभूमीवर मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी गाडय़ांच्या किंमतींमध्ये वाढ करावी लागणार असल्याचे सांगितले. प्रदुषणावर आम्ही २०२० पर्यंत युरो ६ च्या श्रेणीतील इंजिन उत्पादित करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ’ठेवला आहे. मात्र प्रदुषणामध्ये कारचे सहभाग फक्त २ टक्के असताना ही करवाढ आम्हाला धक्का देणारी असल्याचे ते म्हणाले. याचबरोबर किंमत वाढीवर अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.