देशाच्या संरक्षण सज्जतेत अभाव असल्याबद्दल भाजपचे नेते अरुण जेटली यांनी चिंता व्यक्त केली आहे. संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टनी यांची निर्णय घेण्याची असमर्थता मुख्यत्वे ही परिस्थिती उद्भवण्यास कारणीभूत आहे, अशी टीकाही जेटली यांनी केली आहे.
आपल्या संरक्षणविषयक खरेदीलाही मोठय़ा प्रमाणावर फटका बसला आहे. अ‍ॅण्टनी यांनी निर्णय न घेतल्यानेच ही परिस्थिती ओढवली आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील संबंध पुढे आले आहेत. त्यामुळे भारताने बेसावध न राहण्याची गरज आहे, असे जेटली यांनी म्हटले आहे.पाकिस्तानपेक्षा भारताचे लष्करी सामथ्र्य निश्चितच वरचढ आहे, मात्र सध्या ही दरी हळूहळू कमी होत चालली आहे. ज्या देशाची आंतरराष्ट्रीय सीमा १५ हजार कि.मी. आहे त्या देशाला केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून राहता येत नाही, असेही जेटली म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun jaitley slams antony for lack of defence preparedness