पावसाने दिलेली मोठी ओढ आणि इराकसह आंतरराष्ट्रीय वातावरण यामुळे चिंतेचे ढग असतानाही विकासदर ५.४ ते ५.९ टक्क्यांपर्यंत राहील, असा विश्वास बुधवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर केला. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळातच जेटली यांनी हा अहवाल सभागृहामध्ये मांडला.
अहवालातील ठळक वैशिष्ट्ये
गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रात विकासाची गती मंदावली
विकासाची गती मंदावण्याचा उद्योग क्षेत्रावर मोठा परिणाम
महागाई कमी झालेली असली, तरी ती आजही अपेक्षेपेक्षा जास्तच आहे
गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील
आर्थिक वर्ष २००७-०८ पर्यंत खासगी गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीचा ओघ चांगला होता. त्यानंतर गुंतवणुकीत घट होत गेली
गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारने योजलेल्या उपायांमुळे आणि प्रशासनामुळे विकासदर येत्या काही वर्षात ७ ते ८ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता
करधोरणात सुटसुटीतपणा आणणे गरजेचे
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2014 रोजी प्रकाशित
पावसाची ओढ आणि आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे अर्थव्यवस्थेवर चिंतेचे ढग
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर केला.

First published on: 09-07-2014 at 05:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun jaitley tables economic survey in lok sabha amid chaos