नरेंद्र मोदी हे लोकांना कस्पटासमान लेखतात. लोकांना वापरा आणि फेका हीच त्यांची नीती असून ते निर्दयी आहेत, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री अरूण शौरी यांनी केली आहे. ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीवर शुक्रवारी करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. मोदी हे स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडालेले गृहस्थ आहेत. घटनांचा फायदा उचलण्यात वाकबगार आहेत. त्यांचा लोकांबद्दलचा दृष्टीकोन वापरा आणि फेकून द्या, असा आहे. ते लोकांना पेपर नॅपकिनसारखे वापरून घेतात, असे शौरी यांनी या मुलाखतीत म्हटले.
‘ऑगस्टा’प्रकरणी डोंगर पोखरून अदृश्य उंदीर! 
याशिवाय, मोदींचा कारभार अध्यक्षीय थाटाचा असल्याचा घणाघाती आरोप शौरी यांनी केला. मोदींचा अहंकार देशासाठी घातक आहे. सध्या सरकार ज्या दिशेने वाटचाल करत आहे ते पाहता, नागरी स्वातंत्र्य दडपून टाकण्यासाठी पुढील काही वर्षांत अधिक नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले जाऊ शकतात. आपल्याविरोधात आवाज दडपून टाकण्याचे प्रकार होतील, असे शौरी यांनी म्हटले.

Story img Loader