इंडिया आघाडीतला एक पक्ष निखळल्याचं शुक्रवारी (९ फेब्रुवारी) पाहायला मिळालं. राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी हे एनडीएत सहभागी होणार असल्याच्या वृत्तांवर काल शिक्कामोर्तब झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयंत चौधरी यांचे आजोबा आणि भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार घोषित केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना रालोदचे प्रमुख जयंत चौधरी यांना एनडीएत सहभागी होण्याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, “आता कुठल्या तोंडाने मी नकार देऊ?” त्यानंतर आता आणखी एक पक्ष मोठा इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या अफवा उठल्या आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली आहे की, आम आदमी पार्टी पंजाबमधील सर्व लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यांचा पक्ष लवकरच राज्यातील १३ उमेदवारांची यादी जाहीर करेल. या घोषणेसह आपने स्पष्ट केलं आहे की, ते पंजाबमध्ये काँग्रेससह कुठल्याही पक्षाशी युती करणार नाहीत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणले, मी आज पुन्हा एकदा सर्व जनतेसमोर हात जोडून आशीर्वाद मागतो. दोन महिन्यांनी होणारी लोकसभा निवडणूक आम्ही लढवणार आहोत. पंजाबमधील सर्व १३ जागा आणि चंदीगडमधील एका जागेवर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करणार आहोत. येत्या १० ते १५ दिवसांत मी आमच्या सर्व १४ उमेदवारांची यादी जाहीर करेन. मी सर्व जनतेला विनंती करेन की, ज्याप्रकारे तुम्ही दोन वर्षांपूर्वी मला आणि आमच्या आम आदमी पार्टीला आशीर्वाद दिला. तसाच आशीर्वाद यावेळी पुन्हा एकदा द्या. आमच्या सर्व १४ उमेदवारांना मोठ्या मताधिक्यासह जिंकवा.

इंडिया आघाडी बनवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीला रामराम करत भाजपाशी घरोबा केला आहे. दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीदेखील पश्चिम बंगालमध्ये ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यामुळे आता केजरीवालही आघाडीतून बाहेर पडले तर आघाडीची उत्तर भारतातील ताकद कमी होऊ शकते.

(बातमी अपडेट होत आहे.)

Story img Loader