पीटीआय, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का बसला आहे. कथित मद्या धोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वैद्याकीय कारणास्तव अंतरिम जामिनासाठीचा त्यांचा अर्ज बुधवारी दिल्ली न्यायालयाने फेटाळला. तसेच न्यायाधीशांनी केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ केली आहे. त्याचवेळी विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी तिहार तुरुंग अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडीत त्यांच्या वैद्याकीय गरजांची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिलेला २१ दिवसांचा अंतरिम जामीन समाप्त झाल्यावर अरविंद केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केले. मात्र, त्यानंतर अंतरिम जामीन मिळावा, यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल केली होती. केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणी घेताना दिल्लीतील शहर न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली असून, अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे केजरीवाल यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
यापूर्वी झालेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी ईडीकडून या अंतरिम जामिनाला जोरदार विरोध करण्यात आला होता. याचिका सुनावणीयोग्य नसल्याचा युक्तिवाद ईडीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी केला.