आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी विजेच्या दरवाढीविरोधात सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे.
या बेमुदत उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून पक्षाच्या सहकार्यानी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांचा रक्तदाब, शरीरातील साखरेचे प्रमाण आणि वजनात घट झाल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
विजेच्या दरवाढीविरोधात आतापर्यंत ८२ हजारांच्या वर नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या असून या मागणीचे पत्र दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal continued his hunger strike on fifth day