गॅसच्या किमती वाढविल्याबद्दल संबंधित मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणारे दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी शनिवारी सडकून टीका केली आह़े  केजरीवाल यांना साधे कायदेसुद्धा कळत नाहीत, अशा शब्दांत मोईली यांनी त्यांची खिल्ली उडविली आह़े
गॅस दरवाढीचा निर्णय कॅबिनेटचा होता,  माझा वैयक्तिक नव्हता़  त्यामुळे केजरीवाल यांचे माझ्याविरुद्धचे आरोप, हे कॅबिनेटविरुद्धचे मानायला हवेत़  मुळात हे आरोपच आधारहीन आहेत, असे मोईली यांनी येथील आंतरराष्ट्रीय बांबू प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितल़े ‘आप’ शासनाच्या वीज दर सवलतीसारख्या योजनांचासुद्धा यावेळी मोईली यांनी सडकून  समाचार
घेतला़