Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज (१७ सप्टेंबर) दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे सूपूर्द केला. यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदी लवकरच आतिशी मार्लेना विराजमान होणार आहेत. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला? काही दिवसांवर दिल्लीच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या आधी राजीनामा दिल्यामुळे केजरीवाल यांची ही राजकीय खेळी आहे का? असे अनेक सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत एक प्रकारे २०१३ ची आठवण करून दिली आहे का? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केल्यानंतर २०१३ मध्ये झालेल्या दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ ने ७० पैकी २८ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सरकार स्थापन केलं होतं. मात्र, त्यानंतर ४९ दिवसांमध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दिल्लीत पुन्हा निवडणुका झाल्या आणि अरविंद केजरीवाल यांनी बहुमत मिळवलं होतं. त्यामुळे आता देखील २०२५ मध्ये दिल्लीची निवडणूक आहे. या निवडणुकीला आता काही महिने उरले असतानाच अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या २०१३ च्या पॅटर्नची चर्चा होत आहे.

Amol Kolhe on Devendra Fadnavis
Amol Kolhe: “…याचा अर्थ महायुतीचे सरकारच येणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत अमोल कोल्हेंची सूचक टिप्पणी!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
AAP leader and Delhi minister Kailash Gehlot resigned from party
Kailash Gehlot resigns: विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा झटका; कॅबिनेट मंत्री कैलाश गेहलोत यांनी आरोपांची राळ उठवत दिला राजीनामा
vijay salvi
कल्याणमधील ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांचा राजीनामा
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
ajit pawar on sharad pawar (1)
“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांची ‘त्या’ विधानावर टिप्पणी; मांडलं ६० वर्षांचं गणित!
Ajit pawar on Yogi Adityanath
Ajit Pawar on Yogi Adityanath: योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “बाहेरच्या नेत्यांनी…”
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान “छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर मुंब्र्यात उभारुन दाखवा, आम्ही..”

हेही वाचा : Delhi New CM Atishi : मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर आतिशी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ” दिल्लीचे एकमेव मुख्यमंत्री…”

२०१३ मध्ये नेमकी काय घडलं होतं?

अरविंद केजरीवाल यांनी २ ऑक्टोबर २०१२ रोजी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २६ नोव्हेंबर २०१२ रोजी आम आदमी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या निवडणुकीत उतरत सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अरविंद केजरीवाल यांनी आपण भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी राजकारणात आलो असं सांगत जोरदार प्रचार केला आणि पहिल्यांदाच दिल्लीत तब्बल ७० पैकी २८ जागांवर विजय मिळवला. त्यांनी दिल्लीत काँग्रेसबरोबर आघाडी करत सरकारही स्थापन केलं. मात्र, हे सरकार फक्त ४९ दिवस चाललं आणि त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दिल्लीत जवळपास एक वर्ष राष्ट्रपती राजवट लागली होती. त्यानंतर दिल्लीत पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ जागा जिंकत बहुमत मिळवलं. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत स्वबळावर सरकार स्थापन केलं.

त्यानंतर पुढे २०२० मध्ये अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता मिळवली. यानंतर आता २०२५ मध्ये दिल्लीची विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे ऐन निवडणुच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, दिल्ली मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडी आणि सीबीआयने अटक केली होती. दिल्ली मध्य धोरण प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यामध्ये अरविंद केजरीवाल जवळपास १५६ दिवस तुरुंगात होते. त्यांनी तुरुंगातून सरकार चालवलं. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले. मात्र, तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी राजीनामा देत मोठी राजकीय खेळी खेळल्याचं बोललं जात आहे.