आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा गुजरात दौरा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना अरविंद केजरीवाल कडवं आव्हान देऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या चर्चांना पूर्णविराम देत पंतप्रधान बनण्यास इच्छूक नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. “मी पंतप्रधान बनायला नाही, तर भारताला जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनवण्यासाठी आलो आहे” असे वक्तव्य गुजरातच्या अहमदाबादमध्ये प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“’आप’ फोडा आणि आमच्यासोबत या”; भाजपाने ऑफर दिल्याचा मनिष सिसोदियांचा दावा

महिनाभरात अरविंद केजरीवाल यांचा हा पाचवा गुजरात दौरा आहे. दिल्लीतील मद्यविक्री धोरणाबाबत सीबीआय चौकशीला सामोरे जाणारे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची केजरीवाल यांनी यावेळी पाठराखण केली. केंद्रीय संस्थांच्या मदतीने राजकीय विरोधकांना भाजपा लक्ष्य करत असल्याचा आरोप केजरीवालांनी केला. “मनीष सिसोदियांना तीन ते चार दिवसात अटक होऊ शकते असं मी ऐकलं आहे. कुणास ठाऊक मलाही अटक केली जाऊ शकते. गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व केले जात आहे”, असा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला.

मैत्रिणीसोबत कारमध्ये सापडलेल्या भाजपा नेत्याला बायकोने रस्त्यावरच चप्पलने झोडपलं; Video होतोय व्हायरल

अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. दिल्लीप्रमाणेच गुजरातमध्येही मोफत शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करू, असे आश्वासन यावेळी ‘आप’च्या नेत्यांकडून देण्यात आले.