आम्ही आजवर पोलिसांच्या लाठ्यांना घाबरलो नाही, तर अंड्यांना काय घाबरणार ( डंडो से नही डरे, तो अंडो से क्या डरेंगे) अशी प्रतिक्रिया वाराणसीच्या दौ-यावर असलेले आम आदमीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिली. वाराणसीमध्ये रोड शो दरम्यान केजरीवाल यांच्या रोड-शो दरम्यान त्यांच्या गाडीवर काही आंदोलकांनी अंडी फेकली, त्याला उत्तर देताना ते बोलत होते.
अरविंद केजरीवाल आज (मंगळवार) सकाळी वाराणसीत दाखल झाले. दुपारी तीन वाजता ते बेनियाबाग मैदान येथे जनसभा घेणार आहेत. वाराणसीत दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम काळभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतले व नंतर काशीच्या गंगा घाटावर स्थान केले. राजकारण्यांमुळे गंगेचं पाणी गढूळ झालं आहे, असं ते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाराणसीतून नरेंद्र मोदींविरोधात लढण्यास तयार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. तसेच आम आदमीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही मोदींविरोधात वाराणसीतून लढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे वाराणसी मतदार संघात यावेळी मोदी-केजरीवाल-दिग्विजय असे तिरंगी घमासान होण्याची दाट शक्यता आहे. बेनियाबाग मैदान येथील सभेत जनतेचा कौल घेऊन आपण आपला निर्णय जाहीर करू, असं केजरीवाल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.