अरविंद केजरीवाल आणि ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत हे सारखेच आहेत. दोघेही सतत दिखाऊपणा करण्‍याचा प्रयत्‍न करीत असतात. मात्र, या दोघांकडेही दाखवण्यासारखे काहीच नाही, असे ट्विट दिग्विजय सिंग यांनी केले आहे. कोलंबिया विद्यापीठाच्‍या एका विद्यार्थ्‍याने आपल्याला एसएमएस पाठवला असून, मी हे ट्विट करण्‍यापासून स्‍वत:ला रोखू शकत नाही, असं आज (रविवार) काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह म्हणाले.
दरम्यान, आपल्या या वक्तव्यानंतर दिग्विजय सिंग यांनी राखी सावंतची माफीसुध्दा मागितली आहे. मी राखी सावंतचा जुना चाहता आहे, पण केजरीवाल यांच्याशी तुझी (राखी सावंत) तुलना केल्याने मी माफी मागतो, असेही ट्विट त्यांनी केले. काही दिवसांपूर्वी दिग्विजय यांनी केजरीवाल यांना हिटलरची उपमा दिली होती.
शनिवारी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद यांनी केजरीवाल यांना मच्छर म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी ‘मी डेंगीचा मच्छर’ असल्याचे म्हटले होते. मी कॉंग्रेस आणि भाजपचा चावा घेणार असून त्यानंतर ते संकटात सापडतील असंही, केजरीवाल उत्तरादाखल म्हणाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा