एकीकडे महाराष्ट्रात सत्ताधारी विरुद्ध विरोधक आणि ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना पाहायला मिळत असताना राष्ट्रीय स्तरावर आम आदमी पक्षाचा काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांशी राजकीय लढा सुरू आहे. गुजरातसह इतर राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना राष्ट्रीय स्तरावरील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. गुजरातमध्ये आम आदमी पक्ष निवडणुकीत उतरला असून भाजपासह काँग्रेसलाही शिंगावर घेण्याची तयारी आपनं केली आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या एका मागणीवरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

काय आहे केजरीवाल यांची मागणी?

देशात सध्या चलनात असलेल्या नोटांविषयी केजरीवाल यांनी केलेली मागणी चर्चेचा विषय ठरली आहे. विशेषत: काँग्रेसकडून या मागणीला तीव्र विरोध करण्यात येत आहे. “परवा दिवाळी होती. आपण सर्वांनी गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली. सुख आणि शांतीसाठी प्रार्थना केली. व्यापारी तसंच इतर सर्वजण लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती ठेवत असल्याचं आपण पाहतो. रोज सकाळी काम सुरु करण्याआधी त्यांची पूजा करतात. आज माझं केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना आवाहन आहे की, भारतीय चलनावर गांधींजींचा फोटो आहे तो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला गणपती आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावला जावा. जसं मी म्हटलं की, अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. पण सोबतच देवी-देवतांचे आशीर्वादही हवे आहेत”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…

दरम्यान, या मागणीवर नेटिझन्सकडून वाद-विवाद सुरू असताना काँग्रेसकडून त्यावर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “केंद्र सरकार आणि केजरीवाल देशवासीयांची फसवणूक करत आहे”, अशी टीका केली आहे.

“नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा,” केजरीवालांची पंतप्रधान मोदींकडे मागणी, सांगितलं कारण

“कुबेरजींना सोडून दिलं का?”

या सगळ्या प्रकरणावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केजरीवाल यांना खोचक प्रश्न केला आहे.”कुबेरजींना सोडून दिलं का? भगवान विष्णूंशिवाय लक्ष्मीमाता कशा खूश राहणार? आणि नवग्रह? तुम्ही जय श्रीरामचा नारा देता आणि भगवान श्रीरामाला विसरलात? सीतामाता, हनुमानजी नसतील तर अर्थव्यवस्था कशी सुधारणार?” असे प्रश्न सचिन सावंत यांनी ट्विटरवर उपस्थित केले आहेत.

“पण या नोटा कत्तलखाने, मांसाहारी हॉटेल, मासळी बाजार आणि बारमध्येही जाणार. मग आपण काय करणार केजरीवालजी?” असाही प्रश्न सचिन सावंत यांनी ट्विटरवर केला आहे.

“हे जनतेला मूर्ख समजण्यासारखं आहे”

“२०१४नंतर भाजपा आणि आम आदमी पार्टीसारखे पक्ष देशात वैज्ञानिक दृष्टीकोनाऐवजी कट्टरतावाद पसरवून देशाला रसातळाना घेऊन जात आहेत. अर्थव्यवस्थेसारख्या क्लिष्ट प्रश्न नोटांवर देवतांचे फोटो लावल्याने सुटेल असं म्हणणं देशातील जनतेला मूर्ख समजण्यासारखं आहे. यावरून कळतं की नेहरू देशासाठी वरदान का होते”, असंही आपल्या ट्वीटमध्ये सचिन सावंत म्हणाले आहेत.

Story img Loader