Gujarat Election 2022 Exit Polls Result: आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदानोत्तर चाचण्यांवर म्हणजेच एग्झिट पोलवर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा मोठे बहुमत मिळवून सलग सातव्यांदा सत्तेवर येईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी सोमवारी वर्तवला आहे. गुजरातमध्ये यंदा आपने पूर्ण जोर लावत भाजपाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यामध्ये आपला फारसं यश येणार नाही असा एग्झिट पोल्सचा अंदाज आहे.

गुजरातसंदर्भातील एग्झिट पोल काय सांगतात?

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दुसरा टप्पा सोमवारी पार पडल्यानंतर विविध संस्थांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांतील अंदाज जाहीर करण्यात आले. त्यानुसार गुजरातमध्ये भाजपाला १८२ जागांपैकी ११७ ते १५१ जागा आणि काँग्रेससह त्याच्या मित्रपक्षांना १६ ते ५१ जागा मिळतील, असा अंदाज आहे. आक्रमक प्रचाराद्वारे मोठी हवा निर्माण केलेल्या ‘आप’ला मात्र तीन ते १३ जागांवर समाधान मानावे लागेल, असे अंदाज आहेत. बहुमतासाठी ९२ जागा जिंकणे आवश्यक आहे. आपच्या पदरी गुजरामध्ये निराशाच पडणार असली तरी दिल्ली महापालिकेत ‘आप’ला स्पष्ट बहुमत मिळेल आणि भाजपाची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात येईल, असा अंदाज तीन मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवलीय.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!

केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

“हे निकाल सकारात्मक आहेत,” असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. “एका नव्या पक्षाला १५ ते २० टक्के मतदान होतं आणि ते सुद्धा भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी ही फार मोठी गोष्ट आहे,” असंही केजरीवाल यांनी म्हटल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. ‘आज तक- अ‍ॅक्सिस’च्या अंदाजानुसार ‘आप’चे उमेदवार दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये १४९ ते १७१ प्रभागांमध्ये विजय संपादन करतील, तर भाजपाला ६९ ते ९१ जागा मिळतील. ‘टाइम्स नाऊ-इटीजी’च्या चाचणीनुसार ‘आप’ला १४६ ते १५६, भाजपाला ८४ ते ९४ आणि काँग्रेसला ६ ते १० प्रभागांमध्ये विजय मिळेल. ‘द न्यूज एक्स’च्या सर्वेक्षणात ‘आप’ला १५९ ते १७५ आणि भाजपाला ७० ते ९२ जागा मिळतील. याच अंदाजांच्या आधारे केजरीवाल यांनी निकालाला सकारात्मक म्हटलं असून १५ ते २० टक्के मतदानाचा उल्लेख गुजरातमधील एग्झिट पोल्सच्या पार्श्वभूमीवर केला आहे.

नक्की वाचा >> “हेच त्यांचे देशप्रेम का? राज्यावरील बेगडी प्रेम त्यांच्या…”; मोदी भेटीनंतर CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला! ‘मविआ’च्या मोर्चावरही बोलले

हिमाचलमध्ये चुरस…

हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होऊन भाजपा काठावरच्या बहुमताद्वारे सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल, असा चाचण्यांचा निष्कर्ष आहे. हिमाचलमध्ये भाजपाला २४ ते ४१, तर काँग्रेसला २४ ते ४० जागा मिळतील, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. ‘आप’च्या खात्यात जेमतेम तीन जागा पडतील, असा अंदाज आहे. या राज्यात विधानसभेच्या ६८ जागा असून बहुमतासाठी ३५ हा जादुई आकडा आहे. तथापि, दोन सर्वेक्षणांचे अपवाद वगळले तर सर्वच मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांनुसार हिमाचलमध्ये भाजपाच निर्विवाद बहुमताद्वारे पुन्हा सत्ता स्थापन करेल. भिन्न अंदाज वर्तवणाऱ्या दोन चाचण्यांनुसार भाजपा आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी तीव्र रस्सीखेच होईल.

नक्की वाचा >> कर्नाटकने सामंजस्य दाखवायला हवे होते!; मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण

मतमोजणी कधी?

गुजरात आणि हिमाचल या दोन्ही राज्यांतील मतमोजणी गुरुवारी, ८ डिसेंबरला होणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी १२ नोव्हेंबरला, तर गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यांत मतदान घेण्यात आले.

Story img Loader