दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबतच्या प्रश्नावर चर्चा केली. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा दिल्यास विविध यंत्रणांमध्ये योग्य समन्वय ठेवण्यास मदत होईल, असे केजरीवाल या वेळी म्हणाले. केजरीवाल यांच्यासमवेत या वेळी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया होते. केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये रचनात्मक सहकार्य गरजेचे आहे, त्यामुळे शहराच्या विकासाच्या मार्गात राजकीय मतभेदांची आडकाठी येऊ द्यावयाची नाही, असे या वेळी केजरीवाल म्हणाले.
दिल्लीला लवकरच संपूर्ण राज्याचा दर्जा?
दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबतच्या प्रश्नावर चर्चा केली.
First published on: 12-02-2015 at 12:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal raises full statehood issue with home minister rajnath singh