दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबतच्या प्रश्नावर चर्चा केली. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा दिल्यास विविध यंत्रणांमध्ये योग्य समन्वय ठेवण्यास मदत होईल, असे केजरीवाल या वेळी म्हणाले. केजरीवाल यांच्यासमवेत या वेळी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया होते. केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये रचनात्मक सहकार्य गरजेचे आहे, त्यामुळे शहराच्या विकासाच्या मार्गात राजकीय मतभेदांची आडकाठी येऊ द्यावयाची नाही, असे या वेळी केजरीवाल म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा