सध्या देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तुफान चर्चा आहे. राजकीय वादाबरोबरच या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईचे आकडेही सतत बातम्यांचा विषय ठरत आहेत. या चित्रपटावरुन रोज काही ना काही वक्तव्य आणि दावे केले जात आहेत. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अशातच दिल्लीमध्येही भाजपाने हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली होती. त्या मागणीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेली प्रतिक्रिया देत चित्रपट टॅक्स फ्री करायचा असेल तर युट्यूबवर प्रदर्शित करा असे म्हटले. त्यावर आता अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त करत असल्याचे दाखवत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त करत एक ट्वीट केले आहे. या पोस्टमध्ये अनुपम खेर म्हणाले, “मित्रांनो आता तर चित्रपटगृहात जाऊनच द काश्मीर फाइल्स बघा. तुम्हाला ३२ वर्षांनंतर #KashmiriHinds चे दु:ख कळले आहे. त्यांच्यावर झालेला अत्याचार समजून घ्या. त्यांच्याशी सहानुभूती दाखवा, पण जे लोक या शोकांतिकेची चेष्टा करत आहेत. कृपया त्यांना तुमच्या शक्तीची जाणीव करून द्या.” अनुपम यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व
काय म्हणाले होते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
गुरुवारी दिल्ली विधानसभेदरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाइल्सच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाची खिल्ली उडवली. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी दिल्ली विधानसभेत केजरीवाल यांनी विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाइल्सला अनेक राज्यांमध्ये करमुक्त केल्याबद्दल भाजपाची खिल्ली उडवली. तसेच केजरीवाल यांनी भाजपाला सुचवले की चित्रपट टॅक्स फ्री करण्यापेक्षा त्यांनी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला हा चित्रपट YouTube वर अपलोड करण्यास सांगावे. कारण तिथे प्रत्येकजण तो चित्रपट फ्री पाहू शकतील, असंही ते म्हणाले.
आणखी वाचा : “प्रसिद्धी सहन होत नाही, कृपया माझा…”, Viral Video मधील धावणाऱ्या तरुणाची विनंती
आणखी वाचा : या ४ अक्षरांच्या मुली वडिलांसाठी ठरतात लक्ष्मी मातेचे वरदान, घरात आणतात भरभराट
आठ वर्षे देशावर राज्य करूनही भाजपाला राजकीय फायद्यासाठी चित्रपटाची मदत घ्यावी लागत असल्याचा आरोप करत केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. काही लोक काश्मिरी पंडितांच्या नावावर कोट्यवधींची कमाई करत आहेत आणि तुम्ही चित्रपटाचे पोस्टर लावत फिरत आहात, असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला.