पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाने (आप) ३८ उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून, तर मुख्यमंत्री आतिशी कालकाजी येथून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान, भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा नसल्याची टीका या वेळी केजरीवाल यांनी केली.राष्ट्रीय राजधानीत सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या प्रयत्नात असलेल्या आपने त्यांच्या संबंधित मतदारसंघातून वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी बहाल केली आहे.

हेही वाचा >>>Zakir Hussain : झाकीर हुसैन यांच्या निधनामुळे तबला पोरका, जागतिक किर्ती मिळवणाऱ्या कलावंताबाबत या गोष्टी माहीत आहेत का?

भाजपचे पत्ते गुलदस्त्यात

भाजपने मात्र अद्यापही उमेदवारांची घोषणा केलेली नाही. स् नवी दिल्लीत केजरीवाल यांच्या विरोधात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय साहिब सिंह वर्मा यांचा मुलगा प्रवेश वर्मा यांना मैदानात उतरविण्याची तयारी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दिग्गज रिंगणात

पर्यावरणमंत्री गोपाल राय बाबरपूर, आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलास, माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन शकूर बस्ती, तर रघुविंदर शौकीन आणि मुकेश कुमार अहलावत हे मंत्री अनुक्रमे नांगलोई जाट आणि सुलतानपूर माजरा येथून निवडणूक लढवणार आहेत. ओखलामधून अमानतुल्ला खान यांना उमेदवारी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal to contest from new delhi aap announces final list of 38 candidates amy