आम आदमी पार्टी अर्थात ‘आप’ला परदेशी स्वयंसेवकांनी मदतीचा हात दिला आह़े  अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, हंगेरी आणि सिंगापूर अशा जगाभरातील देशांतील ४० हून अधिक विद्यापीठांमधील विद्यार्थी स्वयंसेवकांचा पाठिंबा ‘आप’ ने मिळविला आह़े या विद्यापीठांमध्ये प्रामुख्याने पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जाळे ‘आप’साठी आर्थिक आणि इतरही योगदान देणार आहेत़  हे तरुण ‘आप’ आणि त्याचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या कार्याने भारावलेले आहेत़  भारतातून भ्रष्टाचार हद्दपार करणे आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे, या ‘आप’च्या ध्येयाचे जगभरातील विद्यार्थ्यांना आणि तरुण व्यावसायिकांना आकर्षण आहे, असे शैल कुमार यांनी सांगितल़े  शैल हे आयआयटी फाऊंडेशनचे माजी आयोजक होत़े  आणि ते सध्या ‘आप’च्या या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवकांच्या जाळ्याचे सहसंस्थापक आहेत़़