शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी बाजू मांडण्यास सुरूवात केली आहे. तर महेश जेठमलानी हे शिंदे गटाची बाजू मांडत आहेत. फूट कपोल कल्पित आहे त्याने पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं. त्यावर महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे चिन्हाचा निर्णय लवकर घ्या अशी विनंती जेठमलानी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र या प्रकरणी आता पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. आजही चिन्ह कुणाचं आणि पक्ष कुणाचा याचा निर्णय लागलेला नाही.

महेश जेठमलानी यांनी काय म्हटलं आहे?

महेश जेठमलानी म्हणाले की आम्ही जी कागदपत्रं, नोंदणी हे सगळं सादर केलं आहे. आमच्याकडे बहुमत आहे. आमच्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. ते सगळं ग्राह्य धरलं जावं आणि लवकरात लवकर चिन्हाचा निर्णय घ्यावा. पक्षातून एक मोठा गट बाहेर पडल्यावर तो बेकायदेशीर कसा? असंही महेश जेठमलानी यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही आमदार आणि खासदारांचा मोठा गट आमच्याकडेच आहे असंही जेठमलानी यांनी स्पष्ट केलं.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”

कपिल सिब्बल यांचे दावे फेटाळले

सुप्रीम कोर्टाचा निर्णय समोर येईपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये. तसंच जी कागदपत्रं शिंदे गटाने सादर केली आहेत ती बोगस आहेत हे म्हटलं होतं. मात्र महेश जेठमलानी यांनी हे दावे खोडले आहेत. त्यामुळे लवकर निर्णय घेतला जावा असं जेठमलानी यांनी म्हटलं आहे.

कपिल सिब्बल यांनी काय म्हटलं आहे?

पक्षात असताना जे आमदार निवडून आले आहेत ते पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. संख्याबळाचा दावा केला जातो आहे त्याचा पाया पक्ष आहे. तुम्ही पक्षात असताना पक्षाच्या घटनेला आक्षेप का घेतला नाही असाही प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. शिंदे गटाच्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी ओळख परेड करा अशीही मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. ठाकरे गटही ओळख परेड करायला तयार आहे असंही कपिल सिब्बल यांनी सांगितलं.