आयफोनच्या किंमती खूपच महाग असल्याने अॅपलने चीनमध्ये थर्ड पार्टी वितरकांसाठी या फोनच्या किंमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचधर्तीवर भारतातीलही कंपनीच्या महसुलात घट झाल्याने आता इथं आयफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत बोलताना अॅपलचे सीईओ टीम कूक म्हणाले, भारतातील स्मार्टफोनच्या बाजारात आयफोनच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. मात्र, याला अनेक कारणे असल्याचे सांगताना त्यांनी भारतातील महसूल घट झाल्याची बाब उघडपणे मान्य केली नाही.

कूक म्हणाले, लोक आपल्याकडील जुन्या आयफोनचा वापर बऱ्याच काळापासून करीत आहेत. याचा संबंध मायक्रोइकॉनॉमी फॅक्टरशी जोडता येईल. त्याचबरोबर आयफोनच्या विक्रीवर परिणाम होण्याचे आणखी एक कारण म्हणजे, परदेशी चलन होय. कारण, अमेरिकन डॉलरची किंमत जगातील इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत खुपच अधिक असल्याने त्याचा परिणाम आयफोनच्या किंमती वाढण्यावर होत आहे.

त्याचबरोबर विकसित बाजारांमध्ये अनुदान ही एक मोठी समस्या आहे. अनुदानामुळेही कंपनीच्या महसुलात घट होत आहे. तर तिसरे कारण म्हणजे, आयफोनची बॅटरी बदलण्याची पद्धत. आयफोनची बॅटरी ही दिर्घकाळ टिकणारी आणि सहज बदलता येणारी असल्याने आमचे लाखो ग्राहक याचा फायदा घेत आहेत. त्यामुळे ते त्यांच्याकडील जुने आयफोन बदलून नवीन घेण्याऐवजी जुनेच वापरण्यावर भर देत आहेत.