गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच, अत्याचार, बलात्कारांच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत जात आहे. उत्तर प्रदेशातील बांदा गावातही असाच एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून विकृताने तिच्या मृतदेहाचेही तुकडे केले आहेत.

एका ४० वर्षीय दलित महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नव्हे तर हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडेही करण्यात आले. उत्तर प्रदेशच्या बांदा गावात हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.

Uddhav thackeray Manifesto
Uddhav Thackeray Manifesto : सुरतमध्ये महाराजांचं मंदिर, मुलांना मोफत शिक्षण अन् जीवनावश्यक वस्तूंचे स्थिर दर; राधानगरीच्या सभेत ठाकरेंनी कोणती वचने दिली?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
sharad pawar ajit pawar (4)
“जी व्यक्ती जाऊन ९ वर्षं झाली…”, शरद पवारांची आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानावर नाराजी!
Anis Ahmed, Anis Ahmed Congress, Anis Ahmed latest news, Anis Ahmed marathi news,
अर्ज भरण्याची वेळ चुकवणारे अनिस अहमद पुन्हा काँग्रेसमध्ये
Pune Crime Unsafe City Pune City Issues Education Assembly Election 2024
लोकजागर : ‘पुण्य’कीर्तीचे पतन
Gopal Shetty Borivali Vidhansabha Contituency
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची बंडखोरी की माघार? फडणवीसांना भेटून आल्यानंतर भूमिका काय?
CM Eknath Shinde on Arvind Sawant Statement about Shaina NC
CM Eknath Shinde : अरविंद सावंत यांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणापायी…”
Devendra Fadnavis, Nagpur Devagiri, Nagpur,
नागपूरच्या देवगिरीवर फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री अडीचपर्यंत बंडखोरांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न

नेमकं काय घडलं?

मंगळवारी (३१ ऑक्टोबर) ही महिला आरोपी राजकुमार शुक्लाच्या घरी पिठाची गिरणी साफ करण्यासाठी गेली होती. तिच्यामागून तिची २० वर्षांची मुलगीही तिथं पोहोचली. परंतु ती तिथे पोहोचली तेव्हा तिला बंद खोलीतून आईच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला, अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर संदीप तिवारी यांनी दिली.

काही वेळाने खोलीचा दरवाजा उघडला असता मुलीला धक्कादायक दृश्य समोर दिसलं. तिच्या आईचा मृतदेह तीन तुकड्यांत विखुरलेला होता. यानंतर, राजकुमार शुक्ला, त्याचा भाऊ बौवा शुक्ला आणि रामकृष्ण शुक्ला यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी बेपत्ता असून या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. X वरील पोस्टमध्ये यादव म्हणाले की, बांदा येथील दलिताच्या बलात्कार आणि हत्येची बातमी हृदय पिळवटून टाकणारी आहे. उत्तर प्रदेशातील महिला घाबरल्या आहेत आणि संतप्तही आहेत.”

आयआयटी-बीएचयूच्या एका विद्यार्थिनीबरोबर अश्लील वर्तन केल्यानंतर तिला विवस्त्र करण्यात आलं. तसंच तिचा व्हिडिओही शूट करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे या घटना उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या तोंडावर चपराक आहेत आणि भाजपाच्या शून्य सहनशीलतेचा चेहरा उघडा पडला आहे, असंही अखिलेश यादव म्हणाले.

“उत्तर प्रदेशातील महिलांचा भाजप सरकारवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. आता या सरकारकडून कोणतीही अपेक्षा करणे निरर्थक आहे,” असे यादव म्हणाले.