केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी देशातील ५४३ जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणूक कार्यक्रमांची प्रतिक्षा होती. घोषणेआधीच देशभरात लोकसभा निवडणुकीचा महौल तयार झाला होता. पक्षबांधणी, मोर्चेबांधणी, जाहीर सभा, प्रचारसभा, आश्वासनं दिली जात आहेत. २०१४, २०१९ मध्ये महायुतीने अभूतपूर्व यश संपादन केलंय. यंदाची निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे २०२४ मध्ये महायुती की इंडिया आघाडी विजयी होतेय याकडे सर्वांचं लक्ष आहे. तसंच, २०२४ नंतरच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून तयारी सुरू झालीय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात सूचक वक्तव्य केलं आहे.

मी तर २०४७ ची तयारी करतोय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१६ मार्च) इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच आगामी निवडणुकीबाबत भाकीत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मोदी काय आहेत हे शोधण्यासाठी तुमची संपूर्ण टीम लावा. त्यांना ते शोधून काढू द्या. तुम्ही २०२९ ला अडकलात, मी तर २०४७ ची तयारी करत आहे”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ नंतरच्या निवडणुकांबाबतही सकारात्मक भाष्य करून तेच पुढेही भाजपाचंच सरकार सत्तेत राहणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. आजच लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या असताना त्यांचं हे विधान महत्त्वाचं आहे.

What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Narendra Modi Slams Uddhav Thackeray
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला, “राहुल गांधी ज्या दिवशी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतील तेव्हा…”
Sanjay Raut Ajit Pawar Gautam Adani
Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जोरगेवारांनी थेट फडणवीसांसमोरच व्यक्त केली मुनगंटीवारांवरील नाराजी; म्हणाले, “उमेदवारी मिळू नये म्हणून…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते लाडकी बहीण योजना..”, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

हेही वाचा >> Lok Sabha Elections 2024 : ५४३ जागा असताना ५४४ जागांसाठी निवडणूक जाहीर, एक मतदारसंघ वाढला? नेमकं गणित काय?

देशांत स्टार्टअप्स कंपन्या वाढल्या

“जेव्हा मी अशा कॉन्क्लेव्हला जातो तेव्हा माझ्याकडून हेडलाइन्सची अपेक्षा केली जाते. पण मी डेडलाइनवर काम करणारा व्यक्ती आहे, हेडलाईनवर नाही”, असा टोलाही मोदींनी लगावला. देशातील स्टार्टअप्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. “१० वर्षांपूर्वी जवळपास १०० स्टार्टअप्स होते. आता १.२५ लाख स्टार्टअप्स नोंदणीकृत आहेत. भारतातील स्टार्टअप ६०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये आहेत, ज्यात देशाच्या क्षेत्रफळाचा ९० टक्के वाटा आहे,” पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा >> Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, EC कडून सात टप्प्यांतील कार्यक्रम जाहीर; महाराष्ट्रात केव्हा होणार मतदान?

मी सर्वाधिकवेळा ईशान्येकडील राज्यांत दौरा केलाय

२०१४ पासून त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी ६८० वेळा ईशान्येकडील राज्यांना भेटी दिल्या आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. ते म्हणाले, “मी, पंतप्रधान म्हणून देशाच्या इतर सर्व पंतप्रधानांनी केलेल्या एकत्रित दौऱ्यांपेक्षा ईशान्येकडील राज्यांना जास्त भेटी दिल्या आहेत.”