सरकारने आपल्या उदासीनतेसाठी माफी मागितली पाहिजे. त्यांनी सैनिकांच्या कुटुंबाची आणि देशाची माफी मागितली पाहिजे. तसेच जी कृती पाकिस्तानने केली त्याचा बदलाही घ्यायला हवा, असं भाजप नेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या. स्वराज म्हणाल्या, जर शहीद हेमराजचे शिर परत नाही करता आले तर भारताने दुस-या बाजूने कमीतकमी १० शिरं आणली पाहिजेत. त्यांनी केंद्र सरकारला शेजारच्या देशाच्या विरोधात कडक कारवाई करण्यास सांगितले आहे.
भाजप अध्यक्ष नितिन गडकरी आणि राजनाथ सिंहसोबत हेमराजच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर सुषमा स्वराज यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘‘ जर शहीद हेमराजचे शिर परत नाही करता आले तर भारताने दुस-या बाजूने कमीतकमी १० शिरं आणली पाहिजेत.’’
त्या म्हणाल्या, ‘‘प्रश्न हा आहे की आपण कोणतीही कारवाई केल्याशिवाय शांत बसणार का आणि फक्त चर्चाच करणार का? असं व्हायला नको. कमीत कमी सरकारला कोणत्यातरी पध्दतीने प्रतिक्रिया व्यक्त करायला हवी. यासाठी आम्ही म्हटले आहे की सरकारला कठोर पावले  उचलायला हवीत.
भारतीय लष्कराचे गस्तिपथक मंगळवारी पुंछ जिल्ह्यातील मानकोटे येथे नियंत्रण रेषेजवळ असताना पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. तसेच पाकिस्तानी सैनिकांच्या एका तुकडीने नियंत्रण रेषा ओलांडून १०० मीटर अंतरावर असलेल्या या गस्त दलावर हल्ला केला. यावेळी दोन लान्स नाईक हेमराज व सुधाकर सिंग यांची हत्या करण्यात आली. या दोघांचे शिरही कापून नेण्यात आले होते.
भाजपा नेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या की, ‘‘आज देश मागणी करत आहे. सरकारने कमजोरपणा सोडायला हवा. पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेखा पार करून आमच्या सैनिकांना मारले आणि त्यांचे शिर सोबत घेऊन गेले.. यावर काहिच प्रतिक्रिया असायला नको? या कृतीचे कोणत्याही पध्दतीने समर्थन केले जाणार नाही.

Story img Loader