मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असलं तरी देशातील इतर ठिकाणी तापमानात वाढ होत आहे. वाढत्या उन्हाच्या झळा आता नागरिकांना असह्य वाटू लागल्या आहेत. तसेच याचा फटका नागरीकांसह प्राणी आणि पशुपक्षांनाही बसतो आहे. दरम्यान, वाढत्या उन्हापासून प्राण्याचं संरक्षण करण्यासाठी रांचीतील बिरसा मुंडा अभयारण्यातील व्यवस्थापनाने भन्नाट शक्कल लढवली आहे.

हेही वाचा – आधी प्रेयसीच्या वाढदिवसाची ग्रँड पार्टी, पण सेलिब्रेशन संपताच केली गळा चिरून हत्या; संशयातून प्रियकराचं धक्कादायक कृत्य!

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर

उन्हापासून प्राण्यांचा बचाव करण्यासाठी बिरसा मुंडा अभयारण्यातील व्यवस्थापनाने एअर कुलरची व्यवस्था केली आहे. तसेच या प्राण्यांना हंगामी फळं आणि मल्टीव्हिटॅमिन्सदेखील दिलं जात आहे. याबरोबर याप्राण्यांसाठी शेड आणि ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

यांसदर्भात बोलताना, बिरसा मुंडा अभयारण्यातील पशु चिकित्सक डॉ. ओ.पी. साहू म्हणाले, वाढत्या उन्हाची झळ नागरिकांबरोबरच प्राण्यांनाही बसू लागली आहे. या उन्हापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही संपूर्ण अभयारण्यात एअर कुलर लावले आहेत. तसेच ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्राण्याचं थेट उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही शेडदेखील उभारले आहे.

पुढे बोलताना त्यांनी प्राण्यांच्या आहारात बदल केले असल्याची माहितीही दिली. आम्ही प्राण्याच्या आहारतही बदल केले आहेत. मांसाहार करणाऱ्या प्राण्यांना आम्ही प्रतिदिन १२ किलो मांस देत होतो. मात्र, आता आम्ही त्यांना दरदिवशी केवळ १० किलो मांत देतो आहे. तसेच प्राण्यांसाठी मल्टीव्हिटॅमिन्सचीही सोय करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – अजबच! पॅसिफिक महासागराला लागली गळती; ९ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होण्याची वैज्ञानिकांना भीती!

दरम्यान, गेल्या काही दिवसांत झारखंडमध्ये पारा ४० अंश डिग्री सेल्सियस पार गेला आहे. शुक्रवारी डाल्टनगंज जिल्ह्यात ४२ अंश डिग्री सेल्सियससह राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले. तर जमशेदपूरमध्येही ४१ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.