माफिया डॉन व राजकीय नेता अतिक अहमद यांचा मुलगा असद अहमद याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी झांशी येथे एन्काऊंटर केलं आहे. उमेश पाल हत्याकांडप्रकरणात नाव समोर आल्यापासून असद फरार होता. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी असद आणि त्याच्या अन्य एका साथीदाराचं एन्काऊंटर केलं आहे. यानंतर पोलिसांनी मृत असदचा फोन ताब्यात घेतला होता. या फोनमध्ये पोलिसांना एक भयावह व्हिडीओ आढळला आहे. या व्हिडीओमध्ये असदचे काही साथीदार एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ जानेवारी २०२१ मधील असून एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या असद अहमदच्या मोबाईलमध्ये सापडला आहे. हा व्हिडीओ असद राहत असलेल्या लखनऊच्या एका फ्लॅटमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. असद या व्हिडीओमध्ये दिसत नसला तरी लोकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्यासाठी तो असे व्हिडीओ बनवत असे, अशी माहिती मिळत आहे. याबाबतचं वृत्त ‘जनसत्ता’ने दिलं आहे.

lawrence bishnoi munawar faruque murder plan
“मला गोदारनं फोन करून मुनव्वर फारूकीच्या हत्येची सुपारी दिली”, मारेकऱ्यानं चौकशीत केलं कबूल; यूकेमध्ये रचला हत्येचा कट!
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Mahalaxmi murder case
“जर मी तिला मारले नसते तर तिनं…”, फ्रिज हत्याकांडात मृत आरोपीच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा
iran earthquake or nuclear attack
भूकंप की अणू चाचणी? इराणमधील रहस्यमयी भूकंपामागे नक्की काय?
cheers for Suraj Chavan's victory in Germany
“सुरजबरोबर प्रत्येक सामान्य व्यक्तीचा विजय”, जर्मनीमध्येही सुरज चव्हाणच्या विजयाचा जल्लोष, पाहा Viral Video
explosion that caused injuries and destroyed vehicles at outside the Karachi airport, Pakistan,
Blast in Pakistan : हल्ला की अपघात? पाकिस्तानच्या कराचीतील स्फोटात चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?
Rohit Sharma Statement on T20 World Cup Final He Allows Teammates To Sledge South Africa Batters
Rohit Sharma: “तुम्हाला हवं ते बोला, पंच-रेफरींना नंतर बघून घेऊ”, रोहितने खेळाडूंना वर्ल्डकप फायनलमध्ये शेरेबाजी करण्याची दिलेली सूट, स्वत: केला खुलासा
Man Kill father murderer after 22 Years
बदला पुरा! वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी २२ वर्ष वाट पाहिली, मोठा होताच त्याचपद्धतीने केली मारेकऱ्याची हत्या

एक तरुण नग्नावस्थेत फरशीवर बसलेला दिसत आहे. तर काही तरुण पीडित तरुणाला बेल्ट आणि लाथांनी बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ असद अहमदच्या फोनमध्ये आढळला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.