Asad Ahmed Funeral : उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने केलेल्या चकमकीत ठार झालेला असद अहमदच्या पार्थिवावर प्रयागराज येथील कसारी – मसारी दफनभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले. तंसच, शुटर गुलामच्या पार्थिवावर मेहंदौरी येथील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दोघांचेही पार्थिव अत्यंत कडेकोट बंदोबस्तात दफनभूमीत नेण्यात आले होते. अंत्यसंस्कारासाठी असदचे वडील कुख्यात गँगस्टर अतिक अहमदला परवानगी नाकारण्यात आली होती. एनआयएने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

प्रयागराजचे सहायक पोलीस आयुक्त आकाश कुल्हारी यांनी सांगितले की, ‘असदच्या कुटुंबातील 20-25 जवळचे नातेवाईक अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. असदच्या आजोबांनी असदच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली.’ ‘आम्ही असदचा प्रेमाने सांभाळ केला होता’, अशी प्रतिक्रिया यावेळी असदच्या आजोबांनी दिली.

ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?

कडेकोट बंदोबस्तात अंत्यविधी

उमेश पाल हत्येप्रकरणी असद अहमद आणि गुलाम हसन फारार होते. उमेश पाल हत्याप्रकरणात गुलाम हसन सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यामुळे या दोन्ही आरोपींच्या शोधात उत्तर प्रदेश पोलीस होते. त्यांच्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी ५ लाखांचं बक्षिसही लावलं होतं. ते प्रयागराजच्या दिशेने जात असल्याचं कळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांचा पाठलाग केला. दरम्यान, झांसी येथे दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात असद आणि गुलाम या दोघांचाही मृत्यू झाला. या दोघांवर आज सकाळीच अंत्यसंस्कार करण्यात आले. असदच्या अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी जमली. परंतु, दफनभूमीत मोजक्या लोकांनाच परवानगी देण्यात आली. शनिवारी सकाळीच त्याचे पार्थिव प्रयागराज येथे आणण्यात आले. स्मशानभूमीबाहेरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ड्रोनद्वारेही नजर ठेवण्यात आली.

हेही वाचा >> Asad Ahmed Encounter : युपीत गेल्या सहा वर्षांत १० हजार चकमकीत १८२ आरोपींचा खात्मा, हजारो गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश

पार्थिव देण्यास नकार

असदवरील अंत्यसंस्कारासाठी पार्थिव देण्याची मागणी असदच्या कुटुंबीयांनी केली होती. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव पार्थिव देण्यास पोलिसांनी नकार दिला. स्मशानभूमीच्या आतही केवळ अगदी जवळच्या लोकांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. स्मशानभूमीत कोणालाही प्रवेश दिला गेला नाही. संपूर्ण दफनभूमी परिसराला छावणीचे रुप प्राप्त झाले होते.