Asaduddin Owaisi on RSS chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरसंघचालक मोहन भागवत हे त्यांच्या एका विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलताना दोन किंवा तीन मुलांपेक्षा कमी मुले झाली तर समाजाचे अस्तित्व टिकणार नाही असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा होत असून यावर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औवेसींनी मोहन भागवातांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधुनिक लोकसंख्या शास्त्र असं सांगतं की लोकसंख्या वृद्धीदर २.१ पेक्षा कमी झाला की कोणतं संकट आलं नाही तर तो समाज नष्ट होतो. अनेक भाषा, समाज असे नष्ट झाले असल्याचे मोहन भागवत म्हणाले होते.

मोहन भागवत काय म्हणाले?

नागपूर येथील बी.आर.ए. मुंडले शाळेच्या सभागृहात रविवारी कठाळे कुलसंमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, “जणसंख्या कमी होतेय हा चिंतेचा विषय आहे. कारण आधुनिक लोकसंख्या शास्त्र सांगतं, २.१ च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो. कोणी त्याला मारेल असं नाही, त्याला काही संकट नसलं तरी तो नष्ट होतो, पुढे चालत नाही. अनेक भाषा, समाज असे नष्ट झाले. त्यामुळे २.१ च्या खाली येता कामा नये. आपल्या देशाची जणसंख्या नीती जेव्हा ठरली, त्याच्यातही २.१ च्या खाली नसावे असे सांगण्यात आले. पण ०.१ तर माणूस जन्मत नाही, म्हणजे २ पेक्षा जास्त पाहिजे किंवा कमीत कमी ३ पाहिजे, असं शास्त्र सांगतं”, असे मोहन भागवत म्हणाले.

हेही वाचा>> “…अन्यथा आम्ही आमचं पुस्तक उघडू”, राऊतांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांऐवजी…”

असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रया

भागवतांच्या या विधानानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. औवेसी म्हणाले की, “हे त्यांनी नरेंद्र मोदींना शिकवायची गरज आहे. जे लोकसभा निवडणूकीत म्हणाले होते की मुस्लिम महिला जास्त मुले जन्माला घालतात. पंतप्रधान त्यांच्या भाषणात म्हणाले की, हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून त्या महिलांना दिले जाईल ज्या जास्त मुले जन्माला घालतात. आता मोहन भागवत म्हणत आहेत की जास्त मुलं जन्माला घाला. आरएसएसवाल्यांनी लग्न करायला सुरूवात केली पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही आम्हाला शिव्या देता… झारखंडमध्ये म्हणाले की मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaddudin owaisi on rss chief mohan bhagwat statment on 3 child to avoid decline in population video marathi news rak