Asaduddin Owaisi On Babur, Aurangzeb : मुघल बादशाह औरंगजेब आणि टिपू सुलतानवरून देशभरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. औरंगजेबाचे पोस्टर आणि सोशल मीडिया स्टेटसवरून महाराष्ट्रात राडे झाले. त्यापाठोपाठ टिपू सुलतानवरून कर्नाटकसह दक्षिण भारतात राजकारण सुरू आहे. याचदरम्यान, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ओवैसी म्हणाले, भारतात इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझं मुघलांवर प्रेम नाही, परंतु इतिहास बदलला जातोय. असं वाटू लागलं आहे की, लाल किल्ला मोदींनीच बांधला आहे.

ओवैसी म्हणाले, तुमच्याकडे टिपू सुलतानचा फोटो असेल तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. परंतु त्याच टिपू सुलतानचा फोटो भारताच्या संविधानात आहे. औरंगजेबाबद्दल ओवैसी म्हणाले तुम्ही आधी औरंगजेबाच्या फोटोची पुष्टी करा. औरंगजेब ३०० वर्षांपूर्वी मेला आहे. तुम्ही कसं काय म्हणू शकता की हा फोटो औरंगजेबाचा आहे. बाबरी मशिदीचा विरोध करताना हे लोक आम्हाला बाबरच्या औलादी म्हणायचे, आता हेच लोक आम्हाला औरंगजेबाची औलाद म्हणू लागले आहेत.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…

ओवैसी यांनी सध्याच्या मोदी सरकारची हिटलरच्या जर्मनीशी तुलना केली आहे. ते म्हणाले आम्ही भारतात १९३० मधला जर्मनी पाहत आहोत. अशाच प्रकारे तिथे ज्यू लोकांविरोधात द्वेषपूर्ण भाषणे दिली जात होती. हिटलरच्या राजवटीतही प्रोपगंडावाले चित्रपट बनवले गेले आणि आज काश्मीर फाइल्स आणि द केरळ स्टोरीसारखे चित्रपट भारतात बनत आहेत, दाखवले जात आहेत.

हे ही वाचा >> “माझ्या पत्नीला गुंडांनी अर्धनग्न करून…”, काश्मीरमध्ये तैनात लष्करातील जवानाचा व्हिडीओ व्हायरल, सरकारला म्हणाला…

एआयएमआयएम नेते ओवैसी यांनी आरोप केला आहे की, गेल्या ९ वर्षात (मोदी सरकारचा कार्यकाळ) गोमांस, हिजाब आणि हलालच्या नावावर मॉब लिंचिंगची प्रकरणं झाली. उत्तराखंडमधील अल्पसंख्याकांना घरं खाली करायला लावली. त्यापैकी एक भाजपाचा अल्पसंख्याक नेतादेखील होता.

Story img Loader