Delhi Election Candidates : दिल्लीत येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. अशात सत्ताधारी आम आदमी पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आम आदमी पक्षाने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षानेही दिल्लीतील उमेदवार जाहीर करायला सुरूवात केली आहे. अशात एमआयएमने २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीतील आरोपी ताहीर हुसैन यांना उमेदवारी दिली आहे. हुसेन हे आधी आम आदमी पक्षात होते. दंगलीतील आरोपांनंतर आम आदमी पक्षाने त्यांचे निलंबन केले होते. गेल्या वेळी दिल्लीत झालेल्या महापालिका निवडणुकीत हुसैन यांनी विजय मिळवला होता.

ताहीर हुसैन यांच्या उमेदवारीची घोषणा करताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “दिल्लीचे नगरसेवक ताहीर हुसैन यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघात ते आमचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि समर्थकांनी आज माझी भेट घेत पक्षात प्रवेश केला.”

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Mumbai ED filed supplementary charge sheet against OctaFX and other related entities
ऑक्टाएफएक्स प्रकरण : ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, देशातील व्यवहारांतून ८०० कोटी जमा केल्याचा आरोप

भाजपाकडून टीका

असदुद्दीन ओवैसी यांनी ताहीर हुसैन यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा करताच दिल्ली भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मिश्रा म्हणाले, “औवैसी यांनी अंकित शर्माच्या हत्येसाठी कारणीभूत असलेल्या व्यक्तीशी संबंध जोडले आहेत. ज्याच्या घरात बॉम्ब आणि दगडे सापडली होती. तसेच याने दिल्लीत शेकडो हिंदूंना मारण्याचा प्रयत्न केला होता. औवैसी यांनी लक्षात ठेवावे की, जर ताहीर हुसैन यांच्या नावावर आणखी एखादी दंगली झाली तर, याचे परिणाम त्यांच्या सात पिढ्यांना लक्षात राहतील.

हे ही वाचा : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

हुसैन यांना न्यायालयाचा दिलासा

दरम्यान ताहीर हुसैन यांना नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दिल्ली दंगल प्रकरणातील गुन्ह्यातून त्यांचे नाव हटवण्याचे आदेश दिले आहेत. २७ फेब्रुवारी २०२० मध्ये हुसैन यांच्यावर दाखल झालेल्या या गुन्ह्यात दंगल घडवल्याचे आरोप आहेत. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले की, आरोपीवर दुसऱ्या एका प्रकरणात हेच आरोप आहेत.

दिल्लीत गेल्यावेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत ताहीर हुसैन नेहरू नगर प्रभागातून आपच्या तिकिटावर विजयी झाले होते. हुसैन यांच्यावर दिल्लीतील दंगल प्रकरणी गंभीर आरोप आहेत. २४ फेब्रुवारी २०२० रोजी दिल्लीत झालेल्या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला होता. तर, ७०० जण जखमी झाले होते.

Story img Loader