असदुद्दीन ओवैसी हे अखिलेश यादव यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं आहे. असली हिंदुत्वचा जो मुद्दा अखिलेश यादव यांनी उपस्थित केला होता त्यावरुन आता ओवैसी यांनी अखिलेश यादव यांना खडे बोल सुनावले आहेत. तुम्ही संविधान आणि धर्मनिरपेक्षता वाचवणार नाही का? असा प्रश्न ओवैसी यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे ओवैसींनी?
अखिलेश यादव हे म्हणत आहेत की असली हिंदुत्व वाचवलं पाहिजे. मागच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांना एक गठ्ठा मुस्लिम मतं मिळाली आहेत. ज्या व्यक्तीला एक गठ्ठा मुस्लिम मतं मिळाली आहेत तो व्यक्ती (अखिलेश यादव) म्हणतो आहे की असली हिंदुत्व वाचवलं पाहिजे. उत्तर प्रदेशच्या मुस्लिमांना तुम्ही मूर्ख का बनवत आहात? सध्या देशभरात मुस्लिमांना टार्गेट केलं जातं आहे. अशा वेळी अखिलेश यादव हिंदुत्व वाचवण्याच्या गोष्टी करत आहेत. संविधान कोण वाचवणार? सेक्युलरझिम कोण वाचवणार? त्यामुळेच आम्ही सुरुवातीपासून हेच म्हणत आहोत की अखिलेश यादव मूर्ख बनवण्याचं राजकारण करत आहेत. मुस्लिम बांधव आणि अल्पसंख्याकांना मूर्ख बनवलं जातं आहे. मुस्लिमांची दिशाभूल केली जाते आहे. उत्तर प्रदेशच्या मुस्लिमांनी ही बाब लक्षात घ्यावी आणि ढोंगी लोकांना साथ देऊ नये. असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.
रविवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर आरोप केला. भाजपा फूट पाडण्याचं राजकारण करते आहे. अशात आपल्याला असली हिंदुत्व वाचवलं पाहिजे असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. तसंच इंडिया ही विरोधकांची नवी आघाडी फूट पाडणाऱ्या भाजपासाठी चांगला पर्याय आहे असंही अखिलेश यादव यांनी म्हटलं होतं. याच त्यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन असदुद्दीन ओवैसी यांनी अखिलेश यादव यांच्यावर कडाडून टीका केली आहे.