उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभं केलं. त्याच्या धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि वर्गातील उर्वरित विद्यार्थ्यांना त्याला मारण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मारहाणीचा व्हिडीओ ट्वीट करत तीव्र प्रतिक्रिया दिली.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचा आहे. शिक्षिकेने वर्गात इतर मुलांना एका मुस्लीम मुलाला मारण्यास सांगितले आणि त्याचा अभिमान असल्याचं म्हटलं. पीडित मुलाच्या वडिलांनी मुलाला शाळेतून काढून घेतलं आणि लेखी दिलं की, त्यांना कुणावरही कारवाई करायची नाही. वडिलांचं म्हणणं आहे की, त्यांना न्यायाची कोणतीही आशा नाही आणि त्यांना वातावरण खराब होईल अशी भीती आहे.

Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका

“‘गुन्हा करेल त्याला ठोकणार’ असं योगींचं धोरण आहे ना?”

“‘जो गुन्हा करेल त्याला ठोकणार’ असं योगी आदित्यनाथ यांचं धोरण आहे ना? मग आता पोलीस या शिक्षिकेला जाऊ देत आहे असं का? या मुलाबरोबर जे घडलं त्याला योगी आदित्यनाथ आणि त्यांचे द्वेषपूर्ण विचार जबाबदार आहेत. कदाचित या गुन्हेगार शिक्षिकेला ते लखनौला बोलावून पुरस्कार देत सन्मान करतील”, अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली.

“मुस्लीम मुलांना शाळेत ‘जिहादी’, ‘पाकिस्तानी’ म्हणत चिडवणं आता सामान्य”

“बाल न्याय कायदा २०१५ च्या कलम ७५ नुसार दोषींवर कठोर कारवाई करणं हे पोलिसांचं काम आहे. किती मुस्लीम मुलांना आयुष्यभर अपमान सहन करावा लागतो आहे माहिती नाही. मुस्लीम मुलांना शाळेत ‘जिहादी’ आणि ‘पाकिस्तानी’ म्हणत चिडवणं आता सामान्य झालं आहे,” असंही ओवैसींनी नमूद केलं.

“मुलांवर अन्याय होत आहे, मात्र पोलीस आरोपींना सोडत आहे”

ओवैसी पुढे म्हणाले, “सरकारने पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबाला मोबदला द्यावा आणि त्या मुलाचं शिक्षण सुरक्षित वातावरणात होईल हे निश्चित करावं. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग व राष्ट्रीय मानवाधिकार आयोग इतर ठिकाणी तातडीने दखल घेते. मात्र, या प्रकरणात नेमकं काय झालं? एक नोटीसही काढण्यात आली नाही. मुलांवर अन्याय होत आहे, मात्र पोलीस आरोपींना सोडत आहे. असं असेल तर पोलिसांवरच कारवाई का होत नाही?”

हेही वाचा : संतापजनक! उत्तर प्रदेशमधील शाळेत द्वेषाचे धडे, भरवर्गात मुस्लीम विद्यार्थ्याला उभं केलं आणि…

“एका छोट्या गोष्टीवरून एका शाळेवर बुलडोझर चालवला, आता…”

“भाजपाच्या मध्य प्रदेश सरकारने एका छोट्या गोष्टीवरून एका शाळेवर बुलडोझर चालवला होता. इथं एका विद्यार्थ्याला त्याच्या धर्माच्या आधारे मारहाण होत आहे आणि एक साधं निषेधाचं ट्वीट नाही आलं,” असं म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली.

Story img Loader