बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आल्यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना असं मुक्त करणं हाच तुमचा अमृत महोत्सव आहे का? असा प्रश्न ओवेसी यांनी विचारला आहे. तसेच महिला सन्मानाच्या वेळी भाजपाला मुस्लीम महिलांचा विसर पडतो, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा – काश्मिरी पंडितांवरील हल्ला मोदी सरकारचे अपयश, असदुद्दीन ओवैसी यांची टीका, कलम ३७० हटवण्यावरूनही साधला निशाणा

काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी?

बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींची सुटका केल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. ”बिल्किस बानो प्रकणातील ११ आरोपींना भाजपाच्या सरकारने मुक्त केले आहे. हे तेच ११ लोक आहेत, ज्यांनी पाच महिन्याच्या गर्भवती असलेल्या बिल्किस बानो यांच्यावर आळीपाळीने अत्याचार केले होते. तिच्या ३ वर्षाच्या मुलीची हत्या केली होती. तसेच तिच्या कुटुंबियांचीही हत्या केली होती. अशा गंभीर गुन्ह्यातील दोषींना भाजपाच्या सरकारने मुक्त केले आहे. हा पंतप्रधान मोदी यांचा अमृत महोत्सव आहे का?”, असा प्रश्न औवेसी यांनी विचारला आहे.

हेही वाचा – Nitish Kumar Cabinet Expansion : ‘महागठबंधन’ सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार, वाचा कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं

”…तर गोध्रा कांडमधील आरोपींची सुटका का नाही?”

”सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींच्या शिक्षेचे परिक्षण करण्याचे म्हटले होते, आरोपींना मुक्त करा, असं म्हटलं नव्हतं. हाच जर न्याय असेल, तर मुंबई स्फोटातील आरोपी असलेल्या रुबीना मेमनला किवा गोध्रा कांडमधील आरोपींची का सुटका करण्यात येत नाही. ते सुद्धा १७ वर्षांपासून शिक्षा भोगत आहेत”, असेही म्हणाले.

हेही वाचा – Bobby Kataria: विमानात धुम्रपान केल्याप्रकरणी सोशल मीडिया स्टार बॉबी कटारियावर गुन्हा दाखल, सात महिन्यांनंतर पोलिसांची कारवाई

”तेव्हा भाजपाला महिला सन्मानाचा विसर पडतो”

”भाजपा जे निर्णय घेतात, ते धर्मावर आधारीत असतात आणि ते एकतर्फी असतात. आरोपींची सुटका करण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र, अशी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना सोडणे योग्य नाही. आपण स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून महिलांच्या सन्मानाबाबत आणि सुरक्षिततेबाबत बोलतात आणि दुसरीकडे अशा प्रकारे आरोपींना सोडण्यात येते. यावरून दिसून येते की, भाजपा केवळ महिला सुरक्षेच्या गोष्टी करतं. मात्र, जेव्हा मुस्लीम महिलांचा विषय येतो. तेव्हा त्यांना महिला सन्मानाचा विसर पडतो”, असेही ते म्हणाले.

Story img Loader