प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देशभरात संतपाची लाट उसळली आहे. या वक्तव्यामुळे हैदराबादमध्ये सध्या तणावाचे वातावरण असून सिंह यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, टी राजा सिंह यांच्या वक्तव्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाकडून मुस्लिमांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातोय. भाजपाला देशातील सामाजिक सलोखा टिकू द्यायचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी टी राजा सिंह यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करतात का? असा सवाल ओवैसी यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त विधान केलेल्या भाजपा आमदाराला अटक; हैदराबादमध्ये रात्रभर सुरु होती आंदोलनं

“भाजपा मुस्लीम तसेच प्रेषित मोहम्मद यांचा द्वेष करते. भाजपाचे हे अधिकृत धोरण आहे. भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. त्यांनी केलेल्या वक्तव्याची व्हाईस रेकॉर्डिंक तपासासाठी पाठवली पाहिजे. तसेच त्यांच्या या वक्तव्यांची पुढील चौकशी केली पाहिजे,” असे ओवैसी म्हणाले.

हेही वाचा >>> Sonali Phogat : टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

“हैदराबादमधील शांतता भाजपाला पाहवत नाहीये. भाजपाला सामाजिक सलोखा टिकू द्यायचा नाही. मुस्लिमांना भावनिक तसेच मानसिकदृष्ट्या त्रास द्यायचा हे भाजपाचे अधिकृत धोरणा आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा सध्या तुरुंगात आहेत का? त्यांना भाजपाने पोलीस संरक्षण दिले आहे. भाजपा आमदाराने केलेल्या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत आहेत का?” असा सवालही ओवैसी यांनी केला.

हेही वाचा >>> “मानववंशशास्त्रीयदृष्ट्या हिंदूंचा कुठलाही देव ब्राह्मण नाही”; जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांचं वक्तव्य

भाजपा आमदाराने नेमके काय वक्तव्य केले?

भाजपा आमदार टी राजा सिंह यांना ज्या व्हिडीओमुळे अटक झाली तो १० मिनिटं २७ सेकंदांच्या व्हिडीओचं टायटल ‘फारुकी के आँख का इतिहास सुनिये’ असं आहे. श्री राम चॅनेल तेलंगाणा नावाच्या युट्यूब चॅनेलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोमवारी रात्री अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये गोशामहलचे आमदार राजा हे स्टॅण्डअप कॉमेडियन मुन्नवर फारुकीसंदर्भात बोलताना दिसत आहेत. फारुकीच्या कॉमेडी शोवर राजा यांनी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या संदर्भातून टीका केली. शर्मा यांचं थेट नाव न घेता त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचा उल्लेख राजा यांनी केल्याचं व्हिडीओत दिसत आहेत. शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaduddin owaisi criticize bjp mla t raja singh over controversial comment on prophet mohammad prd
Show comments