माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न तर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना पद्मविभूषण दिल्याच्या सरकारच्या निर्णयाला एमआयएमचे अध्यक्ष व हैदराबादचे खासदार असाउद्दीन ओवैसी यांनी हरकत घेतली आहे.
बाबरी मशीद प्रकरणी गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेल्या अडवाणी यांना पद्मविभूषण देणे योग्य नव्हते, याच अडवाणींनी रथयात्रेचे नेतृत्व केले होते हे विसरता येत नाही असे ओवेसी यांनी सांगितले.भाजप नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अयोध्या प्रश्नावर वादग्रस्त विधाने केली होती ती यू टय़ूबवर उपलब्ध आहेत. ५ डिसेंबर १९९२ मध्ये त्यांनी आम्ही जमीन सपाट करून टाकू असे वक्तव्य केले होते त्यांना भारतरत्न देणे योग्य नाही असेही ओवैसी यांनी एका पुस्तक प्रकाशन समारंभात सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा