सध्या विवेक अग्निहोत्रींचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बराच गाजतोय. केवळ बॉलिवूड कलाकार आणि काही राजकीय नेतेच नाही तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलं असून चित्रपट पाहण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. दरम्यान, द कश्मीर फाईल्स चित्रपटावरून हैदराबादचे खासदार आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

The Kashmir Files आधी काश्मीरच्या परिस्थितीवर बनले होते ‘हे’ लोकप्रिय चित्रपट

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

एनडीटीव्हीशी बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, “चित्रपट पाहिल्यानंतर लोक मुस्लिमांविरोधात व्हिडीओ बनवत आहेत. देशात मुस्लिमांविरुद्ध द्वेष का वाढवला जात आहे? सोशल मीडियावर असे किती व्हिडीओ पडले आहेत, ज्यात लोक सिनेमागृहात उभे राहून मुस्लिमांच्या विरोधात भाषण करत आहे, असं का होतंय?,” असे प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केले आहेत.

“काश्मीर फाईल्समधील कागद फडफडून दाखवू नका”; बाळासाहेबांची आठवण करुन देत संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं

पुढे ते म्हणाले की, “काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित मारले गेले, त्यांच्यावर अत्याचार झाला हे मान्य आहे. एकूण २०९ काश्मिरी पंडित मारले गेले. माझ्याकडे सगळ्यांची नावं आहेत, जी मी देऊ शकतो. पण जे १५०० हिंदू मारले गेले, जे काश्मिरी पंडित नव्हते, जे डोग्रा भागातील होते, त्यांच्यासाठी अश्रू कोण ढाळणार?, असा सवाल करत गेल्या सात वर्षांपासून सत्तेत असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना एखादा चित्रपट पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली का,” असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला.

“ब्राह्मणांसाठी जानवं आवश्यक, पण…;” हिजाब निकालावर संतापले असदुद्दीन ओवेसी

ओवेसी म्हणाले की, “मी अनेकदा लोकसभेत म्हटलोय की, तुम्ही कमिशन ऑफ इन्क्वायरी कायद्यांतर्गत स्वतंत्र चौकशी आयोग स्थापन करा, सगळं समोर येईल की आतापर्यंत किती काश्मिरी पंडित स्थलांतरित झाले आणि का?, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या सात वर्षांच्या काळात तुम्ही किती काश्मिरी पंडितांना परत काश्मीरमध्ये पाठवलं, हे देखील सांगा, फक्त द्वेष पसरवू नका,” असं म्हणत ओवेसींनी मोदी सरकारवर टीका केली.

Story img Loader