सद्गुरू जग्गी वासुदेव, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि पर्यटन मंत्री जयंता मल्ला बरुआ यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात रात्री केलेल्या जंगल सफारीवरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही जंगल सफारी करताना आम्ही कोणताही कायदा मोडला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झालेलं असताना सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी दिल्लीला…”
सद्गुरू जग्गी वासुदेव, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि पर्यटन मंत्री जयंता मल्ला बरुआ यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात रात्रीच्या दरम्यान जंगल सफारी केली होती. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत, वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केलाचा आरोप केला होता.
दरम्यान, यावरून वाद झाल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, रात्रीच्या वेळी जंगल सफारी करून आम्ही कोणत्यातीही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. वन्यजीव कायद्यानुसार रात्रीच्या वेळीही वॉर्डनची परवानगी घेऊन संरक्षित क्षेत्रात प्रवेश करता येतो. काल आम्ही या हंगामासाठी उद्यानाचे औपचारिक उद्घाटन केले होते. त्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव आणि श्री श्री रविशंकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे हा हंगाम पर्यटनाच्या दृष्टीने चांगला राहील, अशा आम्हाला अपेक्षा आहे”
हेही वाचा – रस्त्यांवर हजारो मोकाट गायी, ५०० कोटी अन् ‘भाजपाला मतदान करणार नाही’; गुजरातमध्ये गोमातेमुळे CM, BJP अडचणीत
याबाबत बोलताना आसामचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एमके यादव म्हणाले, वन विभागाने सद्गुरू आणि मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले होतो. त्यांनी कायद्याचे उल्लंघन करून जंगलात प्रवेश केला, हे म्हणणे चुकीचे आहे.