एका महिलेच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटकेत असलेल्या आसाराम बापूंच्या पत्नीची आणि मुलीची अहमदाबाद पोलिसांच्या विशेष तपास पथकाने रविवारी चौकशी केली. अहमदाबादमधील आसाराम बापूंच्या आश्रमात १९९७ ते २००६ दरम्यान आसाराम बापूंनी माझे लैंगिक शोषण केले, असा आरोप एका महिलेने केला आहे. या प्रकरणी आसाराम बापूंना त्यांची पत्नी लक्ष्मी आणि मुलगी भारती यांनीही मदत केली होती, अशी तक्रार या महिलेने केल्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी दहशतवादविरोधी पथकाच्या कार्यालयात या दोघींची चौकशी केली.
 दरम्यान, या महिलेच्या बहिणीने आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
गर्भपातासाठी आसाराम बापूंचा पीडित महिलांवर दबाव
बलात्कार केल्यानंतर पीडित मुलीचा गर्भपात करण्यासाठी आसाराम बापू आणि त्यांचे आश्रमातील समर्थक मुलीवर दबाव आणत असत आणि पीडित मुलीचा गर्भपात केला जात असे. सुरत येथील दोन बहिणींनी काही दिवसांपूर्वी आसाराम यांच्याविरुद्ध लैगिंक छळाची पोलिसांकडे तक्रार केली होती. यासंबंधी या दोघींनी विशेष तपासणी पथकाकडे (SIT) काही पुरावे सादर केले आहेत.
पोलीस नारायण साईच्या मागावर, देश सोडण्यास मनाई
या पुराव्यांचा अधिक तपास करण्यासाठी एसआयटीने स्वंयघोषित गुरु आसाराम यांच्या कोठडीत दहा दिवसांची वाढ करण्याची मागणीची याचिका केली. बलात्‍कार केल्‍यानंतर पीडित मुलींना आसाराम बापू आणि त्यांचे सहकारी गर्भपात करण्यासाठी दबाव निर्माण करायचे. गांधीनगर येथील न्‍यायायालयात पोलिसांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. यासंबंधीचे पुरावे सुरत येथील बहिणींनी सादर केले आहेत
प्रसारमाध्यमांपासून वाचवा- आसाराम बापूंची सर्वोच्च न्यायालयात धाव

Story img Loader