माझ्यावरचे आरोप कोणीही सिद्ध करून दाखवावेत, त्याला आपण पाच लाख रुपयांचे बक्षिस देऊ, अशी घोषणा स्वयंघोषित संत आसाराम बापू यांनी केली आहे. आसाराम बापूंविरोधात एका मुलीने शारीरिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून जोधपूरमधील पोलिसांनी आसाराम बापू यांना शुक्रवारपर्यंत चौकशीसाठी पोलिसांपुढे हजर होण्याचे समन्स बजावले आहे. त्या पार्श्वभूमीवर आसाराम बापू यांनी ही घोषणा केली.
सूरतमध्ये आपल्या भक्तांसोबत जन्माष्टमी साजरी करताना आसाराम बापू यांनी आपल्याविरुद्धचे आरोप सिद्ध करणाऱयाला पाच लाख रुपयांचे बक्षिस देऊ, असे त्यांनी सांगितले. माझ्याविरुद्ध आतापर्यंत अनेक वेळा वेगवेगळे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, ते कधीही सिद्ध झाले नाहीत. साडेचार वर्षांपूर्वी माझ्या आश्रमात दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, तपासात पुढे काहीही सिद्ध झाले नाही असे सांगून, माध्यमे माझी प्रतिमा मलिन करण्याचे काम करीत आहेत, असे ते म्हणाले.

Story img Loader