शारीरिक शोषणाच्या आरोप असलेले स्वयंघोषित संत आसाराम बापू यांनी गुरुवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्यावर आगपाखड केली. सोनिया आणि राहुल यांच्या सांगण्यावरूनच आपल्याला या आरोपांमध्ये गोवण्यात आल्याचे आसाराम बापू यांनी त्यांचे नाव न घेता म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना आसाराम बापू म्हणाले, मी कोणत्याही पक्षाविरुद्ध नाही. पण मला काही लोकांनी सांगितले की मॅडम आणि त्यांचे पुत्र यांच्या सांगण्यावरूनच हे सर्व घडते आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून त्यांच्या सांगण्यावरूनच देशात धर्मांतरं होत आहेत.
एका अल्पवयीन मुलीने शारीरिक शोषणाचा आरोप केल्यानंतर आसाराम बापू यांच्याविरुद्ध जोधपूर पोलिसांनी समन्स बजावले. त्यांना शुक्रवारपर्यंत जोधपूर पोलिसांपुढे चौकशीसाठी हजर होण्यास सांगण्यात आले आहे. आसाराम बापू शुक्रवारी जोधपूरमध्ये चौकशीसाठी हजर होण्याची शक्यता आहे. पोलिसांपुढे हजर होण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी आपण करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader