पीडित मुलीच्या वडिलांचे उपोषण
अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या आसाराम बापूंच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. “माझ्या मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी आसाराम बापूंना अटक होईपर्यंत अन्नाचा कण घेणार नाही” असे म्हणत पीडित मुलीचे वडील उपोषणाला बसले आहेत.
दरम्यान, आसाराम बापू नेमके आता आहेत तरी कुठे? याचाही काही माहिती मिळालेली नाही. इंदूरच्या पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, आसाराम बापू इंदूरच्या आश्रमात असल्याचे म्हटले जात होते, पण ते तिथे नाहीत त्यामुळे त्यांना अटक करणे कठीण जात आहे. जोधपूर येथील आश्रमात आसाराम बापू यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप मुलीने केला आहे. तेव्हापासून पोलीस त्यांच्या चौकशीसाठी शोध घेत आहेत. याप्रकरणी बापूंना जोधपूर पोलिसांनी ३० ऑगस्टपर्यंत हजर राहण्याचा समन्स धाडला होता. पण, बापू काही हजर झाले नाहीत. त्यामुळे बापूंच्या अडचणींत वाढ झाल्याची चिन्हे आहेत. 

Story img Loader