सोनिया आणि राहुल गांधी यांना विरोध केल्यामुळेच अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना लक्ष्य करण्यात येत आहे. कॉंग्रेसशासित राज्यांमध्ये त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असा आरोप करीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या उमा भारती यांनी आसाराम बापू निर्दोष असल्याचे म्हटले आहे. ट्विटवर केलेल्या ट्विटमध्ये उमा भारती यानी आम्ही सर्व आसाराम बापू यांच्या पाठिशी उभे आहोत, असे म्हटले आहे.
आसाराम बापू यांच्याविरोधात दिल्लीतील एका तरुणीने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. जोधपूरमधील आश्रमात आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप संबंधित मुलींनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.
मध्य दिल्लीतील कमला मार्केट पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. जोधपूरमधील आश्रमात पूजाविधी करण्यासाठी आपल्याला बोलावण्यात आले होते. तिथेच आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे मुलीने तक्रारीमध्ये म्हटले आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर उमा भारती यांनी आसाराम बापूं निर्दोष असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader