चित्रपट अभिनेता सलमान खान याला ‘हिट अँड रन’ प्रकरणात जामीन देण्यात आल्याबद्दल ‘बलात्कारी संत’ आसारामबापू यांनी संताप व्यक्त केला आहे. बलात्कार, दहशत घालणे, बेकायदेशीररीत्या अडकवून ठेवणे व हल्ला करणे इ. आरोपांखाली स्वयंघोषित संतपुरुष आसारामबापू सध्या तुरुंगात आहेत. ‘सलमानने काय जादू केली आहे? त्याला २० मिनिटांसाठीही तुरुंगात जावे लागले नाही आणि मी गेल्या २० महिन्यांपासून गजाआड आहे. माझी जादू माझ्यासाठी काम करत नाही. मला ती सलमानकडून शिकावी लागेल’, असे आसाराम म्हणाल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे.

Story img Loader