अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम यांची काळी कृत्ये आता बाहेर येऊ लागली आहेत. आश्रमात आशीर्वादासाठी येत असलेल्या महिलांना आसाराम त्यांच्या ‘ध्यान की कुटिया’ या छोटय़ाशा खोलीत रात्री एकांतात भेटत असत, असा गौप्यस्फोट आसाराम यांचा सेवक असलेल्या शिवा याने केला आहे. शिवा सध्या जोधपूर पोलिसांच्या ताब्यात आहे.
‘मला अटक केली तर त्याची जबर किंमत निवडणुकीत मोजावी लागेल’
आसारामांच्या आश्रमात ‘ध्यान की कुटिया’ आहे. या कुटियामध्ये आसाराम त्यांना भेटायला येणाऱ्या महिलांना रात्री एकांतात भेटत असत. आसाराम यांच्या या कृत्याच्या आपण सीडी तयार केल्या असल्याचा दावाही शिवाने केला आहे. जोधपूर पोलिसांनी शिवाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी येथील न्यायदंडाधिकाऱ्यांना केली. ती तातडीने मंजूरही झाली. छिंदवाडय़ातील आश्रमातून पीडित विद्यार्थिनीला जोधपूर आश्रमात आणण्याच्या कटात आसाराम यांच्यासह शिवा व आश्रम अधिकारी शिल्पी हेही सामील होते. आसाराम यांच्या सूचनेवरूनच संबंधित विद्यार्थिनीला जोधपूर येथे आणण्यात आले. शिवा तिला व तिच्या पालकांना जोधपूर आश्रमात घेऊन जाणार होता. मात्र, काही कारणास्तव त्याला ते शक्य झाले नाही. म्हणून त्याने भ्रमणध्वनीवरूनच विद्यार्थिनी व तिच्या पालकांना आश्रमात कसे जायचे याच्या सूचना दिल्या. त्या ठिकाणी शिल्पी उपस्थित होती.
नातीसोबत आजोबांनी बंद खोलीत वेळ घालवला तर गुन्हा नाही – आसाराम बापू
तिनेच विद्यार्थिनीला आसाराम यांच्यापर्यंत आणून सोडले. आसाराम यांनी मुलीच्या पालकांना मुलीला एकांतात भेटायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर लैंगिक शोषणाचा प्रकार झाला. या प्रकाराची वाच्यता कुठेही न करण्याची धमकीही आसाराम यांनी संबंधित विद्यार्थिनीला दिली. त्यामुळे भेदरलेल्या मुलीने उत्तर प्रदेशात तिच्या घरी गेल्यानंतरच सर्व प्रकार पालकांना सांगितला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडे या संपूर्ण प्रकारात आसाराम, शिल्पी व शिवा यांच्यात झालेल्या संभाषणाचा पुरावा उपलब्ध आहे. आसाराम यांच्याविरोधात आमच्याकडे भक्कम पुरावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘आसाराम बापूंवर आंधळेपणाने विश्वास ठेवला तेच चुकले’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा