* हे पोलिसांचे षडयंत्र; जाहिरातीतून आरोप
गुजरात पोलिसांनी आसाराम बापूंचे चिरंजीव नारायण साईचा शोध घेण्यासाठीची नोटीस जारी करून तीन दिवस झाल्यानंतरही त्याचा अजून शोध लागलेला नाही. दरम्यान, नारायण साईच्या वकिलांनी नारायण साईंच्या वतीने आज गुरूवार गुजरातमधील सर्व प्रमुख वृत्तपत्रात नारायण साई निर्दोष असल्याच्या जाहिराती देण्याचा घाट सुरू केला आहे. तसेच नारायण साईला सुरत पोलीस या प्रकरणात गुंतविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही या जाहिरातींमधून करण्यात आला आहे.
पोलीस नारायण साईच्या मागावर, देश सोडण्यास मनाई
तसेच नारायण साई कुठेही बेपत्ता वैगरे नाहीत किंवा ते पळूनही गेलेले नाहीत असा दावाही त्यांचे वकील गौतम देसाई यांनी केला आहे. योग्य वेळी नारायण साई न्यायालय आणि पोलिसांसमोर येऊन सत्य काय आहे? ते सांगतील असा दावाही या जाहिरातींमधून करण्यात आला आहे.

Story img Loader