सुरतमधील दोन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला नारायण साई राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यात होता. मात्र, सुरत पोलीस तेथे पोहोचण्यापूर्वीच तो तेथूनही फरार झाला आहे.
नारायण साईकडून निर्दोष असल्याच्या जाहिराती
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचा मुलगा नारायण साई याच्याविरोधात सुरतमधील दोन मुलींनी लैंगिक शोषणाची तक्रार केली आहे. त्यानुसाप पोलिस नारायण साईचा शोध घेत आहेत. या आधी नारायण साई परदेशी जाऊ नये म्हणून त्याचा शोध घेण्यासाठीची नोटीस जारी केली आहे.  गेल्या चार दिवसांपासून नारायण साई फारार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके स्थापन केली आहेत. त्यानुसार त्याच्या ‘मोबाईल लोकेशन’चा शोध घेण्यात आला परंतु, मोबाईल बंद असल्यामुळे तो कुठे आहे हे पोलिसांना समजू शकले नाही. त्यानंतर पोलिसांनी नारायण साईच्या संपर्कात असलेल्यांची चौकशी सुरू केली.. तेव्हा एकाने नारायण साई गंगनापूर येथे असल्याचे समजले व पोलिसांनी छापा टाकला परंतु, त्याआधीच नारायण साईने तेथून पळ काढला होता.
पोलीस नारायण साईच्या मागावर, देश सोडण्यास मनाई   

Story img Loader