बलात्काराचा आरोप असलेल्या नारायण साईच्या शोधासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साई या दोघांच्या विरोधात सुरत येथील दोन बहिणींनी बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
नारायण साई याच्या विरोधात गंभीर गुन्हा असल्याची आम्ही विमानतळावरील अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. त्यामुळे त्याला देश सोडून पळून जाता येणार नाही, असे सुरतचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले. साईचा शोध सुरू असून, याप्रकरणी पोलीस पथके तपास करीत आहेत. तो लपून बसला असेल अशी काही ठिकाणे लक्षात घेऊन आम्ही शोध सुरू केल्याचे अस्थाना यांनी स्पष्ट केले.
अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपावरून ७५ वर्षीय आसाराम ऑगस्टपासून राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात आहेत. त्यातच सुरत येथे आसाराम आणि साई यांच्या विरोधात दोन बहिणींनी बलात्काराची तक्रार दाखल केल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मोठय़ा बहिणीने आसाराम यांच्या विरोधात, तर छोटय़ा बहिणीने नारायण साईच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे.
आसाराम पितापुत्रांवर बलात्काराचा आरोप
आसाराम बापूंचा तुरुंगातच मुक्काम, उच्च न्यायालयाने जामीन नाकारला
आसाराम बापूंच्या मुलाचीही ‘लीला’!; महिलेची फसवणूक
पोलीस नारायण साईच्या मागावर, देश सोडण्यास मनाई
बलात्काराचा आरोप असलेल्या नारायण साईच्या शोधासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साई या दोघांच्या विरोधात सुरत येथील दोन बहिणींनी बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
First published on: 08-10-2013 at 12:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asarams son narayan sai untraceable lookout notice issued