राजस्थानातल्या जोधपूरच्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या आसाराम बापूंच्या समर्थकांनी आज (शनिवारी) एका पत्रकावर जोधपूर येथील आश्रमाबाहेर हल्ला केला. आसाराम बापूंचे समर्थक आश्रमाबाहेर माध्यमांविरुद्ध नारेबाजी करत असताना ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, त्यावेळी आश्रमाबाहेर पोलीस तैनात नव्हते. याचीच संधी साधून परिसरातील स्थानिकांनी पत्रकारावर हल्ला केला. तसेच, त्यांनी माध्यमांच्या वाहनांवरही दगडफेक केली.
याप्रकरणी पोलिसांनी माध्यमांच्या कॅमेराच्या फूटेजवरुन सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे संबंधित पोलीस अधिकाऱयांनी सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी जोधपूर येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, राजस्थान सरकारला याबाबत योग्य ती कारावाई करण्याची विनंती केली आहे.
आसारामबापूविरोधात लैंगिक छळाबाबतची तक्रार दाखल झाल्यापासून अनेक कारणांनी ते अटक टाळत आले आहेत. तरी अलीकडील माहितीनुसार, त्यांनी पोलिसांना शरण जाणार नाही, असे सांगितल्याचे वृत्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा