Elon Musk Affair: एलॉन मस्कच्या १३ व्या मुलाला पाच महिन्यांपूर्वी जन्म दिल्याचा दावा करत सोशल मीडियावर खळबळ उडवून देणाऱ्या कंझर्व्हेटिव्ह एन्फ्लुएन्सर अ‍ॅशले सेंट क्लेअरने, मस्क यांच्यासोबत कथित प्रेमसंबंध कसे सुरू झाले याचा खुलासा केला आहे. या प्रेमसंबंधांमुळे तिला गुप्ततेचे जीवन जगण्यास भाग पडल्याचेही तिने म्हटले आहे.

कथित प्रेमसंबंधाबाबत खुलासे

एन्फ्लुएन्सर आणि लेखर असलेल्या ३० वर्षीय अ‍ॅशले सेंट क्लेअरने, ५३ वर्षीय एलॉन मस्क यांचे वर्णन “मजेदार” आणि “डाऊन टू अर्थ” व्यक्ती असे केले आहे. परंतु सुरक्षिततेसाठी मस्क त्यांच्या बाळाला गुप्त ठेवू इच्छित होते असा दावाही अ‍ॅशले सेंट क्लेअरने न्यू यॉर्क पोस्टला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे.

या मुलाखतीत सेंट क्लेअरने मस्कसोबतच्या कथित प्रेमसंबंधाबाबत अनेक खुलासे केले आहेत. ती म्हणाली, आमच्या प्रेमसंबंधांची सुरुवात ऑनलाइन झाली. मस्क खूप मजेदार आहेत. ते हुशार आहेत. याचबरोबर ते माझ्याशी खूप साधेपणाने वागायचे. त्यांनी सर्वात पहिल्यांदा मला एक्सवर डीएम केला होता. मला वाटते ते एक मीम होते.”

इथून आमचे प्रेमसंबंध सुरू झाले

“एके दिवशी एलॉन मस्क यांची मुलाखत घेण्यासाठी मला सॅन फ्रान्सिस्कोला बोलावण्यात आले. मुलाखतीनंतर, मला त्यांच्या एक मेसेज आला की, ‘आज रात्री प्रोव्हिडन्सला (ऱ्होड आयलंड) यायला आवडेल का? इथून आमचे प्रेमसंबंध सुरू झाले”, असा दावाही या तरुणीने केला आहे.

मुलाच्या सुरक्षतेसाठी…

सेंट क्लेअरने दावा केला की जेव्हा ती गर्भवती राहिली तेव्हा तिला जवळच्या लोकांशिवाय हा प्रकार कोणालाही सांगण्याची परवानगी नव्हती. “मला मी गर्भवती असल्याचे गुप्त ठेवण्यास सांगण्यात आले. माझ्या गरोदरपणात मी पूर्णपणे एकटी पडली होती. मी माझ्या कारकिर्दीत जे काही करायचे ते मी आता करू शकत नव्हतो,” असेही ती मुलाखतीत म्हणाली आहे.

या तरुणीने दावा केला आहे की, मस्क यांनी तिला एक भव्य अपार्टमेंट आणि कडक सुरक्षा दिली पण, या काळात कोणताही रोमान्स नव्हता. एकटी पडली असली तरी, तिच्या मुलाच्या सुरक्षतेसाठी ती शांत राहिली.

कोण आहे अ‍ॅशले सेंट क्लेअर?

अ‍ॅशले सेंट क्लेअरने ‘एलिफंट्स आर नॉट बर्ड्स’ हे पुस्तक लिहिले असून, यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. या पुस्तकातून तिने रूढीवादी दृष्टिकोन मांडले आहेत. याचबरोबर ती बॅबिलोन बी या व्यंगचित्र संकेतस्थळासाठी देखील लेखन करते. याचबरोबर उजव्या विचारसरणीकडे कल असलेली अ‍ॅशले सेंट क्लेअरने सतत विविध विषयांवर आक्रमकपणे व्यक्त होत असते.

Story img Loader