दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ‘भारत पे’चे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन यांना समन्स जारी केला आहे. फिनटेक युनिकॉर्नमध्ये ८१ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. अश्नीर ग्रोव्हर आणि माधुरी जैन यांनी २१ नोव्हेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) मंदिर मार्ग कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं, असा समन्स ईओडब्ल्यूने पाठवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन हे गुरुवारी सुट्टी साजरी करण्यासाठी न्यूयॉर्कला जात होते. दरम्यान त्यांना दिल्ली विमानतळावर रोखण्यात आलं. यानंतर EOW अधिकार्‍यांनी समन्सची पुष्टी करताना ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला सांगितलं की, संबंधित दोघांविरोधात लूकआउट नोटीस जारी केल्यानंतर त्यांना दिल्ली विमानतळावर थांबवण्यात आलं. EOW ने मे महिन्यात ग्रोवर, माधुरी जैन आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्या विरोधात ८१ कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात एफआयआर दाखल केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashneer grover and his wife madhuri jain summoned by delhi police 81 crores alleged scam rmm